पोलीस हवालदाराची धारदार चाकूने गळा कापून केली हत्या

गडचिरोली : ५ जुलै – पोलीस हवालदाराची(वाहनचालक) अज्ञातानी धारदार चाकूने गळा कापून राहत्या घरी नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जगन्नाथ सिडाम (वय ५३) असे हत्या झालेल्याचे नाव असून ते भामरागड़ तालुक्यातिल धोडराज पोलिस मदत केंन्द्रात कार्यरत होते.
काल ते नागेपल्ली येथील आपली राहत्या घरी झोपून असताना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले व काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला. त्यांना चंद्रपुर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, विशाल ठाकुर,पोलिस निरीक्षक प्रविण डांगे, आणि श्वान पथकासह दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply