आता भाजप सत्तेसाठी शिवसेनेबरोबर जाणार नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

मुंबई: ४ जुलै- भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे, पण, भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चूक झाली, असं शिवसेनेला वाटलं, तर ते येतील. त्यावेळी भाजप विचार करेल, असे सूचक विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज रविवारी केले.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथे संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.

Leave a Reply