अकोल्यात ‘लव्ह जिहाद’ ची प्रकरणे दडविली, तर जात नाहीत ना ?

अकोला: ५ जुलै- भौतिक सुखांचे आमिष दाखवून अकोल्यात मुलींची फसवणूक होत असून, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने या प्रकरणांची पोलिस तक्रार होत नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणांना ‘लव्ह जिहाद’ ची किनार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शहरात काही दिवसांपूर्वी तरुण आणि तरुणी संशयास्पद स्थितीत आढळल्याने त्यांना नागरिकांनी रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघेही सज्ञान असल्याने आणि त्यांना तक्रार दाखल करायची नसल्याने पोलिसांनी पालकांना बोलवून समज देऊन सोडून दिले. पण, मुलीच्या समाजातील लोकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्याबाबत सखोल चौकशी केली. मुलींचे समुपदेशन करून त्यांना समजाविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना धक्क्यावर धक्के बसले.
अनेक मुली फसविल्या जाऊन त्यांच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती मिळाली. फसवणूक झालेल्या काही मुली तर अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. ज्या मुली सज्ञान आहेत आणि ज्यांनी तक्रार केली नाही त्याचे काय हा गंभीर प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची कुठल्याही दबावाविना सखोल चौकशी केल्यास मुलींची फसवणूक करणारी मोठी साखळी उघडकीस येऊ शकते, असे मत सूत्रांनी व्यक्त केले. पोलिस प्रशासनाने याची स्वतः दखल घेऊन कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply