रेती, मुरुम आणि गिट्टीचे भाव वाढल्यामुळे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नागपूर: ३ जुलै – राज्य शासनाने गौण खनिजांच्या रॉयल्टीत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने घर बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती, मुरुम आणि गिट्टी महागली आहे. त्यामुळे घर बांधणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. कोरोनामुळे गृहप्रकल्प थंडबस्त्यात आहेत. अनेकांनी घराचे काम थांबविले होते. परंतु, संसर्ग कमी होताच टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली. त्यामुळे अनेकांनी रखडलेले घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्यातच आता महसूल आणि वन विभागाच्यावतीने शासन निर्णय जारी करून ही दरवाढ करण्यात आली आहे.
यामुळे पुन्हा एकदा गौण खनिजातील महागाईचा सामना करावा लागणार आहे. आधीच कोरोना संकटात बांधकामे करताना अडचणीतून मार्ग काढत सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. कवेलू तयार करण्यासाठी वापरली जाणारी साधी माती, बंधारे, रस्ते, इमारत बांधकामात वापरली जाणारी साधी माती ६०० रुपये प्रती ब्रासने उपलब्ध होईल. यापूर्वी याचे दर ४०० रुपये प्रती ब्रास इतका होता. विटा तयार करण्यासाठी वापरली जाणारी चिकन माती, गाळ आणि साधी मातीची किंमत २४० रुपये प्रती ब्रास इतकी झाली आहे.

Leave a Reply