प्रशासनाला डावलून आ. रवी राणा यांनी सुरू केला अमरावतीचा भुयारी मार्ग

अमरावती: ३ जुलै- राजापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळचा भुयारी मार्ग आज शनिवारपासून सुरू करण्याची घोषणा आ. रवी राणा यांनी केली आहे. शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजनही त्यांनी केले आहे, मात्र, मनपा प्रशासनाने हा कार्यक्रम अधिकृत नाही, लवकरच तो कार्यक्रम होईल, असे सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सदर मार्गाचे बांधकाम सुरू आहे. राजकीय तसेच प्रशासकीय अडथळ्यांमुळे हा मार्ग रखडल्याचा आरोप करून आ. रवी राणा यांनी पाहणी केली. भुयारी मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरू झाल्यास या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, गृहिणी आदी सर्वांची कायमस्वरूपी सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भुयारी मार्गात सुविधा अंतिम टप्प्यात आहे.
विशेष म्हणजे, राजापेठवासियांचे श्रद्धास्थान देवी तारामाता मंदिराला धक्का न लावता आणि भाविकांना दर्शनासाठी विशेष जिना तयार करण्यात आला आहे. या पाहणीवेळी उपायुक्त सुरेश पाटील, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता सुभाष चव्हाण, मंगेश कडू, श्याम टोपरे, अभियंता शरद तिनखेडे, कंत्राटदार जुजर सैफी, सुनील राणा, नगरसेविका सुमती ढोके, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, अजय मोरया, सचिन भेंडे, अनिल मिश्रा, पराग चिमोटे, अभिजित देशमुख, अवी काळे, अजय बोबडे यांच्यासह अन्य मंडळी हजर होती.

Leave a Reply