वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

माताजींच्या दरबारी !

भल्याभल्यांना फुटते शेपुट
माताजींच्या दरबारी !
फुटले शेपुट हलू लागते
माताजींच्या दरबारी !

काकाजीही सलाम ठोकिती
माताजींच्या दरबारी !
स्वाभिमानही गळून पडतो
माताजींच्या दरबारी !

वाघांनाही सुटते थरथर
माताजींच्या दरबारी !
बुरखा घेतो राष्ट्रवादीही
माताजींच्या दरबारी !

भ्रष्टाचारा मिळे आसरा
माताजींच्या दरबारी !
देशद्रोहीही घेती विसावा
माताजींच्या दरबारी !

सरडे, घुबडे, काकच दिसती
माताजींच्या दरबारी !
राजहंस तो कुठे दिसेना
माताजींच्या दरबारी !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply