विधिमंडळ अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना काँग्रेसमध्ये वेग

मुंबई:१ जुलै- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होणार आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. विधानसभा अध्यक्षपदाचं पद हे काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विचार सुरू आहे . काँग्रेस पक्षाकडे राज्यातील दलित मतदारांना वळवण्याची सूचना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केली होती. त्यानंतर नितीन राऊत यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच काँग्रेसमधून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमिन पटेल यांच्या नावाचीही चर्चा आहे.
पावसाळी अधिवेशनाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं. या पत्रात विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली. या पाठवलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्द्यावर बरीच चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply