वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

( चाल – कुणाच्या खांद्यावर..)

मुंबईच्या ‘ वर्षा ‘वर साऱ्यांचे डोळे ।
साऱ्यांचे डोळे ।।

‘ वर्षा ‘साठी बघा हो ते कसे झुरतात !
सुंद उपसुंदावाणी कधी लढतात !
कधी साप मुंगूसही उरी भेटतात !
पाहुनिया ‘ वर्षा ‘ कडे जो तो लाळ गाळे ।।
मुंबईच्या ‘ वर्षा ‘वर साऱ्यांचे डोळे।
साऱ्यांचे डोळे ।।

उद्धवजी बसले दिसती आज ‘वर्षा ‘त
दादांनाही हवीआहे ‘वर्षा’ मिळालीतं !
देवेंद्रजी म्हणताहे ,” मी पुन्हा येईन ” !
साहेबही दावतात आपलेच ‘सूळे ‘।।
मुंबईच्या ‘ वर्षा ‘ वर साऱ्यांचे डोळे !
साऱ्यांचे डोळे ।।

‘ वर्षा’साठी करतात नाना लटपटी !
वाघसुद्धा कोल्होबाचे बघा पाय चाटी
मूळ रंग सोडुनीया धरे हिरवी छाटी !
काकदृष्टी असुनिया बनती बकभोळे ! ।।
मुंबईच्या ‘ वर्षा ‘ वर साऱ्यांचे डोळे।
साऱ्यांचे डोळे ।।

            कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply