वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

जेम्स गेला !
पुण्यात्मा गेला !
सारा महाराष्ट्र हळहळला !
शाही इतमामात त्याला राजघाटावर
नेण्यात आले !
राजघराण्यातील रिवाजाप्रमाणे
त्याचे अंत्यसंस्कार झाले !
नन्तर तिथे शोकसभा झाली !
त्याच्या बंधूंनी तिथे त्याची स्तोत्रेही गायली !
एक म्हणाला ,” त्याच्या जाण्याने
पोकळी निर्माण झाली !”
दुसरा म्हणाला ,” राज्याची कधीही
भरून न निघणारी हानी झाली !
तिसरा म्हणाला, महाराष्ट्राची आन बान शान गेली !
असे वाटते जणू इंजिनातील जान गेली !
चौथा म्हणाला,” राजघराण्यातील थोर सदस्य गेला !
आपल्या साम्राज्याचा आधारवड गेला !
सर्व उपस्थित महापुरुषांनी त्याला श्रद्धांजली वाहिली !
वाहिन्यांनीही आपली कामगिरी चोखपणे बजावली !
आणि आता आम्ही वाट पहात आहोत , जेम्सच्या निधनाबद्दल
तीन दिवसांचा शोक मनविण्याच्या
एका ‘राज ‘कीय आदेशाची !

              कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply