भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणाऱ्यांमध्ये हिंदू – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी दिल्ली: ३० जून- देशात धर्मांतरावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच, एका सर्वेक्षणामधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणाऱ्यांमध्ये हिंदू आहेत. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे. धर्मांतराचा सर्वाधिक फायदा ख्रिश्चन समाजाला मिळत आहे.
प्यू रिसर्च सेंटरनुसार, भारतात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणाऱ्यांपैकी ७४ टक्के लोक एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. हेच कारण आहे की, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्येत थोडी वाढ झाली आहे. सर्वेक्षणात सहभागी सहा टक्के दक्षिण भारतीयांनी आपण जन्मापासून ख्रिश्चन असल्याचं सांगितलं, तर सात टक्के लोकांनी आपण सध्या ख्रिश्चन असल्.याचं म्हटलं आहे.
सर्वेक्षणानुसार, धर्मांतर करणाऱ्यांमधील जवळपास अर्धे लोक हे अनुसूचित जातीमधील आहेत. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांपैकी ४५ टक्के लोकांनी भारतात अनुसूचित जातीसोबत भेदभाव हे धर्मांतरण करण्याचं कारण असल्याचं म्हटलं आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वेक्षण नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान करण्यात आले.

Leave a Reply