अहमदनगर महापालिकेत भाजपला हटवून महाविकास आघाडीची सत्ता


अहमदनगर, 30 जून : अहमदनगर महानगरपालिकेत अखेर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत भाजपला सत्तेवरून दूर केले आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची निवड झाली आहे.
महापालिकेमध्ये याआधी भाजप-राष्ट्रवादी आणि बसपाची सत्ता होती, पण जास्त संख्याबळ बळ असतानाही, शिवसेना सत्तेपासून दूरच होती. अहमदनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्र हाललीत. आज बुधवारी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक घेतली. त्या नंतर अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांची महाविकास आघाडीच्या महापौर म्हणून तर, उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांनी निवड झाली. या निवडणुकीत राज्य पातळीवरील मोठ्या नेत्यांना लक्ष द्यावे लागले. त्यानंतर आता महाविकास आघाडी पालिकेची सत्ता आली आहे.

Leave a Reply