स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पीरिपा स्वबळावर लढणार – प्रा. जोगेंद्र कवाडे

भंडारा:२९ जून- भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे. भंडारा येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांकडून सन्मानजनक आघाडी झाली तर, आघाडीत सामील होऊ अन्यथा स्वबळावर या निवडणुका लढविल्या जाणार असल्याचे प्रा. कवाडे म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडीत पीरिपा हा घटक पक्ष असून, सरकारने राज्यपातळीवरील महामंडळ, मंडळ आणि समित्यांमध्ये या पक्षाला प्रतिनिधीत्व द्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूका होऊ नये, अशी आपली भूमिका आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसींची जातिनिहाय जनगणना केली नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन करुन राज्यात ओबीसींची संख्या किती आहे, हे कळेल. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यातील ओबीसी नेते, मंत्री यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणीही प्रा. कवाडे यांनी केली.

Leave a Reply