राजकारणाचा धंदा !
राजकारणासारखा दुसरा धंदा नाही बाबा !
पन ,गॉडफादराचे येथी पाय लागते दाबा !
लुच्चेपना खोटेपना हेच भांडवल याचे !
दात असली लपवायाचे नकली दाखवायाचे ।।
खायगोबरेपनाचीबी आदत टाका लागते !
खाल्ला माल पचवायाले ‘ गुरु ‘कृपा लागते !
वातावरन पाहुनसन्या रंग बदला लागते !
दिल्लीमंदी जाऊनसन्या शेपुट हालवा लागते !
दादा भाई यायच्यासंग दोस्ती जोडा लागते !
त्यायच्या दोस्तीविना गाडी पुढं धकत नसते !
जमत असंन इतलं तं राजकारनात घुसा !
हुच्च मार्गदर्शनाच्या साठी ‘अनिला’ले पुसा !
कवी -- अनिल शेंडे