राज ठाकरेंचा लाडका कुत्रा जेम्सचा मृत्यू

मुंबई:२९ जून-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा समाजमाध्यमातून त्यांचं हे श्वानप्रेम सर्वांसमोर आलं आहे. राज यांनी आपल्या लाडक्या जेम्सला आज मंगळवारी अखेरचा निरोप दिला. यावेळी ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी कुटुंबीय तसंच पक्षातील नेते आणि समर्थक उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा श्वान ‘जेम्स’ गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंसोबत होता. परळमधील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज ठाकरे आणि जेम्स यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Leave a Reply