कोरोना काळात अमरावतीत वारंवार वीज पुरवठा खंडित करणे बंद करा : शिवराय कुलकर्णी

अमरावती: २९ जून- अमरावती शहरातील विजेचा पुरवठा एक वर्षापासून कुठलेही कारण नसताना वारंवार खंडित होत आहे. तो तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्यावतीने वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्या गुजर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे अमरावतीकर जनता हैराण झाली आहे. कोरोनाच्या काळात सर्व नागरीक घरात आहेत. रात्री-बेरात्री वीज पुरवठा अचानक खंडित होत असल्याने घरी थांबलेले नागरीक त्रासले आहेत. शहरातील अनेक युवक वर्क फ्रॉम होम काम करीत आहेत. त्यांना फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
निर्माण झालेल्या गंभीर समस्येची दखल घेऊन वीज कंपनीने वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी भाजपाने केली. आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असेही भाजपाने निवेदनात स्पष्ट केले आहे. यावेळी भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, संघटन सरचिटणीस गजानन देशमुख, मंगेश खोंडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष लता देशमुख हजर होते.

Leave a Reply