उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रा केली स्थगित

डेहराडून: २९ जून-उत्तराखंड सरकारने पुढील आदेश येईपर्यंत चार धाम यात्रा स्थगित केली आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री या तीर्थस्थळांबाबत हा निर्णय आज मंगळवारी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने घेतला आहे. यापूर्वी सोमवारी राज्य सरकारने चारधाम यात्रेसंदर्भात कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. १ जुलैपासून यात्रा सुरू होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आता पुढील आदेश येईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
कोविड महासाथीच्या काळात सुरू केलेल्या यात्रेदरम्यान यात्रेकरू व पर्यटक यांच्यासाठी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थांबाबत असमाधान व्यक्त करत मुख्य न्यायाधीश आर.एस. चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री या तीर्थस्थळांना भेटीची परवानगी देणाऱ्या निर्णयाला स्थगिती दिली. चार धाम यात्रा ही कोविड सुपरस्प्रेडर ठरू नये, असे न्यायालय म्हणाले.

Leave a Reply