ऑनलाईन शाळा सुरू झाल्या पुस्तकाविनाच

नागपूर: २८ जून- कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी ऑनलाईन शाळांचे वर्ग भरणार आहेत . अर्थात प्रत्यक्षात शाळा उघडणार नसून, ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे आज सोमवारपासून गिरविण्यात येणार आहेत. परंतु या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचा अद्याप महापालिका व जिल्हा परिषदेलाच पुरवठा झाला नसल्याने ते विद्यार्थ्यांना पोहोचू शकले नाही. ऑनलाईन शाळा सुरू होत असली, तरी ती पुस्तकाविनाच भरणार असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास सुमारे १५०० शाळा, तर महापालिकेच्या शहरात १५०वर शाळा आहेत. तर इतर अनुदानित अशा एक हजारांवर शाळा शहर व ग्रामीण भागात आहे. येथील सर्व इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या १ लाख ४९ हजारांवर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जवळपास ८ लाख २ हजारांहून अधिक पुस्तकांची मागणी बालभारतीकडे गेल्या अनेक दिवसांपूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते, हे विशेष.

Leave a Reply