जम्मू विमानतळावर झालेल्या स्फोटाने परिसर हादरला

श्रीनगर: २७ जून- शनिवारी मध्यरात्रीनंतर जम्मू विमानतळाच्या तांत्रिक विभागात मोठा स्फोट झाला. हा स्फोट भारतीय हवाई दलाचे काम सुरु असलेल्या भागात झाला आहे. धक्कादायक म्हणजे, जम्मू हवाईतळावर स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एनआयएची चमू जम्मू हवाईतळावर दाखल झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत .
स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायूदल प्रमुख एचएस अरोरा यांच्याशी आज रविवारी बातचीत केली. विक्रम सिंह हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला दाखल झाले आहेत.
पाच मिनिटांच्या फरकानं हे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. मध्यरात्री २ वाजताच्या दरम्यान हा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply