आज आणि उद्या विदर्भासह मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता


नागपूर :२७ जून- हवेच्या चक्रीय स्थितीमुळे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश या भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये ३० जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. यासोबतच आज विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला. दरम्यान, आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते अति हलक्या पावसाची शक्यता आहे. २८ जून रोजी विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन तासांत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण आणि घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात शांत झालेल्या मान्सूनने पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. पण पुढील आणखी एक आठवडा राज्यात अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply