ईडी कार्यालयातील चौकशीदरम्यान आज अनिल देशमुख गैरहजर

मुंबई : २६ जून –  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात आज शनिवारी दाखल झाले. समन्स प्राप्त झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी सकाळी वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवलं. अनिल देशमुख यांनी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. ते चौकशीसाठी आज हजर राहणार नाहीत, असे वकिलांनी सांगितले.

काल शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचलनालयकडून (ईडी) त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आली. आज ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले होते. ईडीने अनिल देशमुख यांना शनिवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर होण्यास सांगितले होते.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या वकिलांनी ईडीला पत्र सोपवले असून, आरोपासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही ईडीला पत्र सोपवले असून, चौकशीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. कारण, ईडीने आरोपासंदर्भातील कोणतीच कागदपत्रे पाठवली नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाहीत. आम्ही आमचे काम पार पडले असून ईडीने आता भूमिका घ्यावी, असे अनिल देशमुख यांचे वकील अँड. जयवंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply