रखडलेल्या स्कायवॉकचे काम पूर्ण करण्यासाठी त्यालाही बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या – नावीत राणांचा आदित्य ठाकरेंना चिमटा

अमरावती : २४ जून – विदर्भाच काश्मीर व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदऱ्यात तबल ३८ कोटी रुपये खर्च करून जागतिक चौथ्या क्रमांकाचा व देशातीला पहिला असा स्कायवॉक नावारूपाला येत आहे. या स्कायवॉकच्या निर्मितीनंतर मेळघाट व चिखलदरा मधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. २०२१ मधे हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असतांना मात्र, अद्यापही काम रखडले आहे. चिखलदऱ्यातील स्कायवॉकला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या,पण त्याचे काम जलदगतीने करा अशी मागणी नवनीत राणांनी आदित्य ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे.
सातत्याने शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या नवनीत राणांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची अचानक मागणी केलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यामुळे नवनीत राणा यांनी पुन्हा शिवसेनेचा चिमटा तर नाही काढला ना असा अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मेळघाट हे सातपुडा पर्वत रांगेत वसलेले आहे. या ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणावर देश विदेशातील पर्यटक येतात. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. त्यामुळे चिखलदरा आणखी वाढावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष प्रयत्न केले. चिखलदरा येथे ३८ कोटी रुपये खर्चून ४०७ मीटर लांबीच्या सिंगल केबलचे काम केले जात आहे.त्यामुळे स्कायवॉकला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच पर्यटन मंत्री म्हणून आपण विदर्भाकडे लक्ष द्या. आदिवासी गोर गरीब जनतेला पर्यटनातून रोजगार संधी मिळेल असं काम करा अशी मागणीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे नवनीत राणा यांनी केली.

जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक हा विदर्भाच्या नंदनवनात चिखलदरा येथे उभारला जात आहे. गोराघाट ते हरिकेन या दोन पॉइंटदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या स्कायवॉकची लांबी 500 मीटर असणार आहे. हा संपूर्ण स्कायवॉक अनब्रेकेबल काचेचा असणार आहे. याची उंची 1500 फुटापेक्षा अधिक असेल.

Leave a Reply