खुर्चीजीवी प्राण्यांची दिल्लीत भरली सभा !
काका झाला सभापती मधोमध उभा!
काका म्हणाला —
आपल्याला प्रत्येकाला हवी आहे खुर्ची !
खुर्चीसाठी प्रत्येकाने हयात घातली खर्ची !
पण सांगा तुम्ही खुर्ची मिळवुन कराल तरी काय ?
खुर्ची म्हणजे आपल्यासाठी कामधेनु
गाय !
हत्ती म्हणाला — खुर्ची मिळताच माझी मी बांधिन स्मारकं!
नोटांचे बंडलगळ्यातआल्हादकारकं!
सायकल म्हणाली–
खुर्ची मिळता बंधिन मी मोठे मोठे इमले !
आणि करीन राज्य सारे
हिरवे हिरवे हिरवे !
झाडू म्हणाला,मला हवी माझ्यासाठी
खुर्ची ही कायम !
हिरव्या सापा पजिन दूध मोडून सारे नियम !
काका म्हणाला, मला लागले डोहाळे
पंतप्रधानाचे !
दात घशात घालायचेत
भावी म्हणणाऱ्यांचे !
ध्यानात ठेवा मित्रांनो
खुर्ची आपला प्राण !
पण, खुर्ची मिळवायाचे आपल्यात
उरले कुठे त्राण ?
कवी -- अनिल शेंडे .