काँग्रेसने विरोधी पक्षांच्या आघाडीत यावे – यशवंत सिन्हा यांचे आवाहन

नवी दिल्ली : २२ जून – विरोधी पक्ष आता अधिक बळकट झाला आहे, असं माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा म्हणाले. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालाचा देशव्यापी परिणाम झाला. पश्चिम बंगाल निवडणूक, विरोधकांची एकजूट, काँग्रेस आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर सिन्हा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव झाला. ममता बॅनर्जींचा मोठा विजय झाला. ममतांनी भाजपला कडवी झुजं दिली. लोकं पुन्हा टीएमसीमध्ये येत आहेत, असं यशवंत सिन्हा म्हणाले.
विरोधी पक्षांनी एकजूट व्हायला हवं. विरोधी पक्षांची बाजू बळकट झाली आहे. जे शक्य आहे ते केलं पाहिजे. सर्वोत्तम स्थितीची वाट बघण्यात अर्थ नाही. काँग्रेसनेही गांभीर्य दाखवून सोबत आलं पाहिजे. काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटेत सहभागी व्हावं. एकत्र आल्याने शक्ती वाढेल. नेता कोण असेल यात पडू नये. सर्व मिळून पंतप्रधान निवडू, असं आवाहन सिन्हा यांनी काँग्रेसला केलं.
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत. पॅकेज कुठलाही सकारात्मक परिणाम दिसला नाही. निधीचा उपयोग हा योग्य प्रकारे व्हायला हवा. चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे आणि डोकलाममध्येही धोका आणखी वाढला आहे, असं सिन्हा म्हणाले.

सरकारने करोनावरील लस मोफत देण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे. करोनावर जास्तीत जास्त लसीकरण हाच उपाय आहे, असल्याचं यशवंत सिन्हा म्हणाले.

Leave a Reply