वर्धा : २२ जून – वर्धा तालुक्यातील बोदळ (मलकापूर) येथील सख्ख्या बहिण भावाचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. वर्धा तालुक्यातील बोदळ मलकापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या दोन बहिण भावांना व आईला अन्नातून विषबाधा होऊन बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दोन बहिण भावांना-आईला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या तिघांना पुलगाव येथे ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मुलाला व आईला सेवाग्राम येथे रेपर करण्यात आले मुलीची प्रकृती ठीक असल्याने तिला सुट्टी देण्यात आली.
उन्नती सिद्धार्थ कांबळे (१०), सम्यक सिद्धार्थ कांबळे(२)अशी मृत्यू झालेल्या बहीण भावांची नावे आहेत. बोदळ मलकापूर येथे कांबळे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दिनांक १८/०६/२०२१ शुक्रवार रोजी सायंकाळी आठ वाजता कांबळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले. मात्र मध्यरात्री एकच्या सुमारास आई व उन्नती सम्यक या तिघांना उलटी आणि जुळबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिघांनाही उपचारासाठी पुलगाव येथील ग्रामीणरुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर सम्यक याला पुलगाव येथून उपचाराकरिता सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले आणि सेवाग्राम येथे उपचारादरम्यान सम्यक याचा १९/०६/२०२१रोजी मृत्यू झाला तर उन्नती तिची प्रकृती ठिक असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथून सुट्टी देण्यात आली दुसऱ्या २०/०६/२०२१ रोजी अचानक उन्नती ची प्रकृती बिघडल्यामुळे तिला सेवाग्राम येथे भरती करण्यात आले आणि उपचारादरम्यान उन्नती तिचा मृत्यू झालाआहे. या सगळ्यांनी शुक्रवारी जेवताना बाहेरून आणलेली जामून व मटन खाल्ले होते व दूध पिले अशी माहिती पुढे येत आहे. मात्र या बहिण-भावाचा मृत्यू नेमके कसे झाले, यासाठी त्याचे उत्तरीय तपासणी करून व्हिसेरा पुणे प्रयोग शाळेला पाठवण्यात आले आहेत. नेमकी विषबाधा झाली कशी याचा शोध पोलीस घेणार आहे