नागपुरात योग दिनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती

नागपूर : २१ जून – केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांच्यातर्फे आज नागपुरात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला . केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचा हस्ते नागपुरातील जुने उच्च न्यायालय परिसरात हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी योगाचे विविध व्यायाम केले आणि देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहरातील नामांकित डॉक्टर, वकील या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते . आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या परिसरात वृक्षारोपण करुन नागरिकांना वृक्ष लावण्याचे आवाहन केले, शिवाय योगाचे महत्व सांगून योग करा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे आवाहनही यावेळी नितीन गडकरी यांनी जनतेला केले आहे.

Leave a Reply