वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सावधान …!

गेल्या काही वर्षांपासून माणसांच्या नवनव्या प्रजाती पैदा होत आहेत !
आणि त्या चिनी कोरोन्यापेक्षाही
अधिक भयंकर आहेत !
आंदोलनजीवी,मत्सरजीवी,भ्रमजीवी,नकारजीवी, हाडुकजीवी ही त्यांच्या वेरीएन्ट्सची नावे आहेत !
नावं भिन्न असली तरी सगळ्यांचे गुणधर्म सारखेच आहेत !गुणसूत्रं एकच आहेत!
आणि ‘सबका मलिकही एकच आहे!
त्यांच्या कार्यपद्धतीत भलेही फरक असेल ,पण ,
सगळ्यांचे टार्गेट मात्र एकच आहे !
देशाच्या प्रगतीत बाधा उत्पन्न करणे!
देशात अराजक निर्माण करणे !
आणि येनकेनप्रकारेण , अगदी शत्रूदेशांशी संगनमत करूनही
सत्ता काबीज करणे !
आणि सत्ता कशासाठी ? तर
केवळ आपला वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वार्थ साधण्यासाठी!
देशाची प्रगती, प्रतिष्ठा, सन्मान
देशाची एकता, अखंडता यांच्याशी
त्यांना देणेघेणेच नाही !
याचं त्यांना मुळीच नाही अवधान !
म्हणून,या प्रजातींपासून देशवासीयांनोअखंड असा सावधान !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply