नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाने केली आत्महत्या

नागपूर : २० जून – मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन ६२ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. दीपक सराफ (वय ६२),असे मृतकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दीपक यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता व कावीळ झाल्याचेही निदान डॉक्टरांनी केले. शनिवारी ते उपचारासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सोमवारी त्यांच्या स्वादुपिंडातील अशांचे नुमने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दीपक यांचा मुलगा चहा आणायला गेला. दीपक हे वॉर्डातून बाहेर आले. त्यानंतर ते तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले. या घटनेने कर्मचारी व रुग्णांमध्ये खळबळ उडाली. कर्मचाऱ्याने अजनी पोलिसांना माहिती देत जखमी दीपक यांना तातडीने मेडिकलमध्ये हलविले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दीपक यांनी आत्महत्या केली की तोल जाऊन ते खाली पडले,याचा तपास अजनी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply