वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सांग सांग भोलानाथ !

सांग सांग भोलानाथ !
सरकार पडेल काय ?
तिघाडीचं सरकार पडुन
कमळ फुलेल काय ? ।। सांग सांग ..

भोलानाथ रात्रंदिवस चरतात इथे सारे !
जनतेच्या कामांचे बांधतात नुसते भारे !।। भोलानाथ …..

भोलानाथ यांच्या हाती सोनियाची कोंबडी !
प्रत्येकजण म्हणतो हवी जादा मला अंडी ! ।। भोलानाथ ….

भोलानाथ सरकार हे तर आहे तीन टांगी !
जो तो एक दुसऱ्याला मारतो आहे नांगी ! ।। भोलानाथ …

भोलानाथ राज्यामधे आहे महामारी
मुख्यसेवक घरात बसुन सर्कस चालवे सारी !।। भोलानाथ…

भोलानाथ दिवसासुद्धा पडतात स्वप्नं मला !
गळ्यामध्ये माझ्या दिसते मुख्यमंत्री माळा ! ।। भोलानाथ …..

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply