नागपूर : १९ जून – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सीआरपीएफ कॅम्प मधील ‘एक मुलाकात जवानो के साथ’ कार्यक्रमाअंतर्गत जवानांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी जवानांशी संवाद साधताना महत्वाच्या प्रश्नांचा उलगडा केला. आपल्याला नागपूरला जल, वायू आणि ध्वनी प्रदुषण मुक्त करायचे आहे.
वायू प्रदुषण रोखण्यासाठी येत्या काळात पेट्रोलच्या गाड्यांमध्ये इथेनॉलचा वापर वाढणार आहे. येत्या काळात Flex इंजिनच्या गाड्या बाजारात असतील. बांधकाम विकासकांची वाहने, मशिने सीएनजीवर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.
गडकरी पुढे म्हणाले, देशात 17 महामार्ग असे बनवत आहोत, ज्या ठिकाणी विमानेदेखील उतरू शकतील. झोझीला टनेलच्या विकासकामामध्ये 5 हजार कोटींची बचत केली आहे. पुण्यातील शिरूर ते वाघोली दरम्यान 4 लेनचा उड्डाणपूल बनवत असल्याचीही माहितीही त्यांनी यावेळी दिली. योग, प्राणायाम, व्यायामाकडे सर्वांनी लक्ष द्यावे. सध्याच्या कोरोना काळात उत्तम आरोग्य आणि व्यायाम आपले कवच आहे. असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.