बुटीबोरीतील दोन शिवसेना नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर : १८ जून – नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग लावला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या दोन नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केला.
विकासनिधी मिळत नसल्याने या नगरसेवकांची शिवसेनेवर नाराजी होती. त्यामुळे नंदा सोनवणे आणि
विद्या दुधे यांनी भाजपचा कमळ हाती घेतला. तसेच, शिवसेनेचे आणखी काही कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या प्रयत्नामुळे शिवसेनेला सुरुंग लागला आहे. तर काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

Leave a Reply