घराच्या ओसरीत मुलीसह बसलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू , मुलगी गंभीर जखमी

गोंदिया : १८ जून – घराच्या ओसरीत 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन पाऊस पाहात बसेलल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गार्डनपूर या गावात ही दूर्दैवी घटना घडली. या घटनेत चिमुकली मुलगी जखमी झाली आहे. अस्ताक बेग मिर्झा (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर फैयजलीन अस्ताक मिर्झा (वय 2) असे जखमी मुलीचे नाव आहे.
जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाचा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी केशोरी परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज पडल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. त्यामध्ये गार्डनपूर येथील मिर्झा कुटुंबातील अस्ताक बेग हे चिमुकल्या फैयजलीन हिला घराच्या ओसरीत बसून पाऊस दाखवत होते. त्याचवेळी आकाशात चमकलेली वीज कोसळली आणि तिने थेट अस्ताक बेग यांचा जीव घेतला. तर यात फैयजलीन मिर्झा ही सुद्धा जखमी झाली.
तिच्या डोळ्यासमोरच वीज चमकल्याने तिचे दोन्ही डोळ्याला दिसेनासे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊसाचा आनंद लुटत असताना वीज पडून घडलेल्या या दुर्घटनेने गार्डनपुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने मिर्झा कुटुंबाला या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply