वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हिंदूहृदयसम्राट पुत्र
हिंदुत्वद्रोही झाले !
सोडून रंग भगवा
हिरव्या प्रितीत न्हाले !

श्रीराम कार्यकाजी
दिसतो तयास घपला !
आयुष्य पूर्ण ज्यांचे
घपल्यातची हो खपले !

हे खंडणी बहाद्दर
पुसतात प्रश्न जेव्हा
मातोश्री सात मजली
त्यांची ती अश्रू ढाळे !

अब्जावधी कुठूनी
आले नसून धंदा !
वस्त्रे गळून त्यांची
ते नागवेच झाले !

रामा अधीक त्यांना
चिष्तीच प्रिय जहाला !
श्रीरामद्रोही रुपडे
त्यांचे समोर आले !

  कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply