राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे – जयंत पाटील

मुंबई : १७ जून – राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांची यादी राज्यपालांकडे आहे. त्यावर विचार झालेला नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती परंतु यावेळी थोडासा विलंब झाला आहे मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देणं आणि दिर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करणं एवढाच माझा आणि त्यांच्या भेटीचा विषय होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply