नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी होणार – नितीन गडकरी

नागपूर : १७ जून – नागपूर ते बुटीबोरी मेट्रो रेल्वेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येईल. शिवाय येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूर- हैदराबाद महामार्गावर बुटीबोरी एमआयडीसी जंक्शनजवळ १.६९ किलोमीटर लांब आणि ७० कोटी किंमतीचे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्याचे लोकार्पण गुरुवारी बुटीबोरी येथे एका कार्यक्रमात झाले. यावेळी गडकरी बोलत होते.
ते म्हणाले, बुटीबोरी येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. या शहराचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. प्रदूषण कमी झाले पाहिजे. स्टेडियम, फूड मॉल येथे होणे आवश्यक आहे. त्यासाठी बुटीबोरी नगर परिषद आपण दत्तक घेणार आहोत. आतापर्यंत जी गावे दत्तक घेतली, त्यांचा चेहरा मोहरा बदलला आहे, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply