गडकरींनी घेतली बुटीबोरी नगरपरिषद दत्तक

नागपूर : १७ जून – भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक शहर बुटीबोरीची नगरपरिषद दत्तक घेतली. गडकरींना आतापर्यंत गावं दत्तक घेतली आहेत, मात्र नगरपरिषद दत्तक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे.
बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला. बुटीबोरी शहराचा सर्वांगीण विकास आणि हरित शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून सर्वत्र ख्याती आहे. गडकरींनी बुटीबोरी उड्डाणपुलाचे आजच लोकार्पण केले. या पुलामुळे वर्धा, हैद्राबाद आणि चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत आणि जलद होणार आहे.
यापूर्वी नितीन गडकरी यांनी गावं दत्तक घेतली आहेत, पण पहिल्यांदाच त्यांनी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ‘बुटीबोरीच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत’ अशी ग्वाही गडकरींनी यावेळी बुटीबोरीवासियांना दिली. बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेतल्याबद्दल नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.
नितीन गडकरी सध्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून धुरा सांभाळत आहेत. संसदेत ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. बुटीबोरी नगरपरिषद ही त्यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येते.

Leave a Reply