नागपूर : १७ जून – अवैधरित्या नागपुरात राहत असलेल्या अफगाणीस्तानच्या नागरिकाला परत त्याच्या देशात पाठवले जाणार आहे. नूर मोहम्मद असे त्या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक आणि विशेष शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अवैधरित्या नागपुरात राहत असलेल्या नूर मोहम्मद याला बुधवारी (16 जून) अटक केली होती. प्राथमिक तपासात फार काही आढळून आले नाही. त्यामळे त्या नागरिकाला परत अफगाणिस्तानला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
रद्दअफगाणी नागरिक असलेला नूर मोहम्मद हा २०१० साली टुरिस्ट विजाच्या मदतीने भारतात आला होता. त्याने भारतात राहण्यासाठी युनाईटेड नेशन आणी ऑर्गनायझेशनकडे अर्ज केला होता. मात्र, त्याचा अर्ज रद्द झाल्यानंतरही तो गेल्या 10 वर्षांपासून अवैधरित्या नागपूरमध्ये राहत होता. पोलिसांना त्याच्यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली. ज्याच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले.’भारतात आपत्तीजनक कृत्य नाही”नूर मोहम्मद हा गेल्या १० वर्षांपासून भारतात राहत आहे. यादरम्यान त्याने कोणतेही आपत्तीजनक कृत्य केल्याचे आढळून आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावरून त्याने प्रो तालिबानी वक्तव्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. नूर मोहम्मद हा तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याची माहिती पुढे आली आहे’, अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.