वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

राजा भिकारी ….. !

राजे ? कोण राजे ? कुठले राजे ?
लोकशाहीत कोणी राजे बिजे नसतात ,
तरीही काही लोक स्वतःला अजूनही राजे समजतात !

बर , तुम्ही स्वतःला राजे म्हणवता ना
तर राजासारखे वागा ना !

महाराजांनी औरंगजेबाला आरक्षण मागितले नव्हते !
स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण केले होते !

राजे स्वाभिमानी असतात
स्वबळावर शून्यातून साम्राज्य निर्माण करण्याची धमक बाळगतात!
आणि हे तर आपल्या प्रजेला लाचारी आणि भिकमागेपणा शिकवतात !

राजे आपल्या जातीचाच विचार करत नसतात ,
ते सर्व प्रजेचे ,जातीधर्माचे असतात ।

शेकडो वर्षांपासून आणि आजही सत्तेची सर्व सूत्रे, सर्व संस्था आणि सत्तास्थानांवर दबदबा असताना
अशी भिकारडी वृत्ती कां ?
अशाने तुमची अवस्था पत्त्यातल्या राजासारखी होणार नाही का ?

        कवी - अनिल शेंडे .

Leave a Reply