बापानेच केला मुलीचा विनयभंग

नागपूर : १६ जून – नागपूर शहरात विनयभंगाच्या गुन्ह्य़ात सातत्याने वाढ होत चालली आहे. गिट्टीखदान हद्दीत बापाने स्वत:च्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीत राहणारा आरोपी हा टेलर आहे. तो त्याची पत्नी, २ मुली आणि २ मुलांसोबत राहतो. त्याची पत्नीही घरकाम करते. काही दिवसांपासून तो त्याच्या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करीत होता. तिने याबाबत तिच्या आईला तक्रार केली होती. मात्र, आईने त्या तक्रारीची दखल घेतली नाही. २५ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मुलीची आईने झोपली असल्याचे नाटक केले. पत्नी झोपली असल्याचे पाहून आरोपीने स्वत:च्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात त्याच्या पत्नीने त्याला अडविले. या घटनेमुळे घरात गोंधळ माजल्याने आरोपी पळून गेला. त्यानंतर १३ जूनला सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो त्याच्या पत्नीला कुठे उभा असलेला दिसले. तिने तेथे त्याला जाब विचारला असता त्याने पत्नीला अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply