रेल्वेतून ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

नागपूर : १५ जून – नागपूर वरून रेल्वे मार्गाने गोंदियाला ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोघांमध्ये महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. ब्राऊन शुगर तस्करी प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे. प्रकाश कोदरलीकर आणि ज्योती करियार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अर्षद नावाच्या आरोपीला आधीच अटक करण्यात आली असून त्याच्या माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर येथील रहिवासी प्रकाश कोदरलीकर हा गोंदियामध्ये व्यवसाय करणारी महिला ज्योती करियार हिला ब्राऊन शुगर पुरवीत होता. याकरीता ज्योतीने अर्षद नामक व्यक्तीला तस्करीच्या कामासाठी ठेवलं होतं. मात्र, लॉकडाऊनमुळे बस आणि रेल्वे बंद असल्याने त्यांच्या व्यवसायाला फटका बसला होता. रेल्वे सूरु झाल्यानंतर ज्योतिच्या आदेशावरून अर्षद महाराष्ट्र एक्सप्रेसमधून ब्राऊन शुगरची तस्करी करू लागला होता. मात्र, पोलिसांना या संदर्भात सूचना मिळाली होती. माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अर्षदकडे सखोल चौकशी केली तेव्हा प्रकाश कोदरलीकर आणि ज्योती करियार या दोन तस्तकारांची नाव पुढे आली. ज्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या डी-१ कोचमध्ये एक बेवारस काळ्या रंगाची बॅग सापडली होती. आरपीएफच्या पथकाने ती बॅग जप्त केली होती. तपासाअंती त्या बॅगमध्ये ब्राऊन शुगर असल्याचं निष्पन्न झालं. बॅगमध्ये ब्राऊन शुगरच्या छोट्या छोट्या ३१० पुड्यांमध्ये आढळून आल्या होत्या. ज्याचे वजन २१.४९० ग्राम इतके असून त्याची किंमत २१ लाख ४९०० इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे.
00000000000000000

Leave a Reply