राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपुरात आगमन

नागपूर : ११ जून – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी १२ वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,पोलीस अधीक्षक नागपूर गामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ब्लाईड रिलिफ असोशिएशनच कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर रविवारी सकाळी दहा वाजता दैनिक भास्कर तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी सव्वा अकरा वाजता अंबाझरी रोड वरील ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते पुन्हा सहभागी होणार आहे. 14 जूनला ते परत मुंबई येथे रवाना होतील.

Leave a Reply