पिंजऱ्यात असला तरी वाघ हा वाघचं असतो – संजय राऊत यांचा टोला

नंदूरबार : ११ जून – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फार गांभिर्यानं घेऊ नका, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. चंद्रकात पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना पिंजऱ्यातला वाघ असेलही, पण वाघ वाघच असतो आम्ही पिंजऱ्याची दार उघडी ठेवली आहे. हिंमत असेल तर त्यांनी पिंजऱ्याच्या आत येऊन वाघाच्या मिशिला हात लावून दाखवावा, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरुवारी त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी काल केक जास्त खाल्ला असेल असा टोलाही राऊतांनी लगावला.
प्रशांत किशोर हे राजकीय आखणीकार असून काही माहिती समजून घेण्यासाठी किंवा काही सर्वेक्षण करण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत त्यांची बैठक होत असेल तर आपण त्यात जास्त लक्ष घालण्याची गरज नसल्याचे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस हा देशातला प्रमुख विरोधी पक्ष असून त्यांचे अनेक तरुण नेते पक्ष सोडून जात आहे. त्यांनी संघटना मजबूत केली पाहिजे कारण विरोधी पक्ष हा लोकशाहीसाठी अधिक मजबूत हवा हे आपण काँग्रेसबाबत म्हटलं असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील सरकार 5 वर्षे चालेल. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर काही वेगवान घडामोडी नसतात. राज्यातले अनेक महत्वाचे प्रश्नासंदर्भात राज शिष्टाचारनरुप मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण संदर्भात काही राज्याची काही भूमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच या संदर्भात काही भूमिका घ्यावी लागेल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे.

Leave a Reply