दोन भरधाव कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी

नागपूर : ११ जून – नागपूर-सावनेर मार्गावरील सदर फ्लाय-ओव्हरवर दोन भरधाव कार एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात सदर मानकापूर पुलावरील पूनम चेंबर समोरील भागात झाला. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा पाऊस सुरू होता. त्याचवेळी ओव्हरटेक करताना दोन्ही कार चालकांना एकमेकांच्या पुढील गाड्यांच्या स्पीडचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघात इतका भीषण होता की अल्टो कारचे चालक स्टेरिंगमध्ये अडकले होते. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी त्या वाहन चालकांला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
घटनेची माहिती समजताच सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave a Reply