अमरावती : ११ जून – अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावण्याने मोठ्या प्रमाणात पेरणीची लगबग सुरू आहे. आधीच बियाण्याचा तुटवडा भासत असताना सोयीबनची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाचा खून करून चोरट्यांनी २५० क्विंटल सोयाबीननं भरलेला ट्रक चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
चोरीला गेलेल्या सोयाबीनची अंदाजे किंमत १८ लाख रुपये आहे. किंमतीचे चाेरट्यांनी ट्रकचालकाचा खुन करून मृतदेह झुडपात फेकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (८ जून) सकाळी अमरावती ते मोर्शी मार्गावरील निंभी ते आसोना गावादरम्यान नागरिकांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले होते. मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून विद्रूप करून झुडुपांमध्ये फेकून देण्यात आला होता. तो मृतदेह एका ट्रकचालकाचा असल्याचं नंतर समोर आलं. हा ट्रकचालक २५० क्विंटल सोयाबीन घेऊन अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने निघाला होता. ट्रकमध्ये सुमारे १८ लाख रुपये किंमतीचे सोयाबीन होते. चोरी गेलेला ट्रक सापडला असून त्यातील सोयाबीन गायब आहे. त्यामुळं चोरीच्या उद्देशानंच चोरट्यांनी ट्रकचालकाची हत्या केल्याचा पोलिसांचा कयास आहे.
खून झालेल्या ट्रक चालकाचं नाव नदंकिशोर सकलू उईके (२८) असं असून तो मध्य प्रदेशातील छंदवाडा जिल्हयातील मोखड येथील राहणारा होता. या प्रकरणी मारेकऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी दिली आहे