गुरांना नेणारा ट्रेलर पलटला, ट्रेलरमधील गुरांचा मृत्यू

वर्धा : १० जून – अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर क्रमांक ५५ ए -८७९५ हा ट्रेलर अमरावती कडे जातांना सावळी खुर्द चढाव मार्गाजवळ रात्रीच्या सुमारास पलटी झाल्याने यात असलेल्या अपघातात जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती कारंजा पोलीस स्टेशन ला मिळाली असता कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी सकाळी ८ वाजता आपल्या सर्व चमू सह घटनास्थळावर दाखल झाले.
या अपघातात जखमी झालेल्या जनावरांना व मृत पावलेला जनावरांना बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या मृत पावलेल्या जनावरांना वेगळ्या बाजूला व जखमी झालेल्या जनावरांना वेगळ्या बाजूला करण्याची व्यवस्था त्यांनी केली व एक माणूस म्हणून प्राणीमात्रांवर दया दाखवत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला लावली.
स्वत:च्या हाताने त्यांना पाणी पाजून माणुसकीची यावेळी जाण करून दिली जखमी जनावरांना पशु वैद्यकीय अधिकार्यांमार्फत डॉक्टरांनी मार्फत प्राथमिक औषधोपचार करण्यात आला यावेळी यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहन धुळे पीएसआय मानकर सह पोलीस सर्व विभागातील सर्व बीड जमादार शिपाई व होमगार्ड यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply