केंद्रा केंद्रा काय करु…
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले …. धरणी फाटली……ज्वालामुखीचा उद्रेक झाला….मामुराजेंचे सिंहासन डगमग डगमग डोलाया लागले….. मंत्री गण ही हलाया लागले….. समयराजे गालातल्या गालात हसाया लागले…… म्हणे बरोब्बर तुक्क्यावर बसले…. आदर्श राजे रडाया लागले , सिंचन राजे फडफडाया लागले…….मराठा जनार्दनाचा उद्रेक जाहला आणि आरक्षण…. आरक्षण…. आरक्षण…मराठा आरक्षणाच्या नकारघंटेत….. अवघा महाराष्ट्र झाकोळून गेला.
आमच्या मनगटात रग ….पण हवे हातात आरक्षण…..
समयाभान ठेवत वंशराजे उभे ठाकले…..अवचित समय आलासे राजकारण खेळण्यासी…… ह्यास पाठिंबा समयराजेंचा – तू हो पुढे मी सांभाळतो……आता वेळ आली तर मामुराजे ना गाळतो…सत्ता कैसी चालवावी….मामु ला कळत नाही….मला फसविले शे कोटी ला ….आता मामुराजे ची धडगत नाही….. मामुराजे कापु लागले चळाचळा…. म्हणु लागले केंद्रा केंद्रा काय करु….तुझ्याच् हाती माझे तारू…… आम्हाला कायदा कळत नव्हता… पिता माझा पाहिजे तसा वळवत होता…… मला मात्र ते जमंत नाही….. अहो म. राज्याचा मी मामु….. पण मला काहीच कळत नाही…. निवडणूक कधी लढलो नाही….पक्ष असाच चालवला…..भाजपाला पकडुन ठेवला….. मग भाजपा ने च् मला चालवला…समयराजेनी भित-या नेतृत्वाला मामु केला…..जो पण येतो म्हणतो ह्यालेच् पेला… म्हणून मी मराठा आरक्षण १० टक्क्याचा काढला फतवा…… सगळे म्हणाले फतवा फसवा……केंद्रा केंद्रा काय करु…….तुझ्याच् हाती माझे तारू…. आरक्षण देतो का….. भेटायला येवू…..राज्यात मला दाखवायचे आहे कित्ती काम करतो मी ….. पाठीमागे मात्र …..आरक्षण न मिळावे म्हणून नुसतेच रकानेच्या रकाने भरतो मी…..खरबुज्या म्हणतो मी पंधरा महिने झक मारली… मुसलमानांना आरक्षण देवून त्यांची पिढी तारली……केंद्रा केंद्रा काय करु…. तुझ्याच् हाती माझे तारू…… बाळाचं लग्न कसं करू …..पोरगी बघायला केंद्र…लग्न लावायला केंद्र…. नातवाची पण व्यवस्था केंद्रा केंद्रा तूच कर….पण त्वरित दे मराठा आरक्षण…. केंद्रा केंद्रा काय करु…..तुझ्याच् हाती माझे तारू……… खरबुज्या म्हणतो भेट आपली प्रिमॅच्युअर…. काहीही कर पण आरक्षण कर अश्युअर….माझी कॉलर पण होईल ताठ…… लोकं ही म्हणतील माठ मामुची कॉलर ताठ…. केंद्रा केंद्रा काय करु…….तुझ्याच् हाती माझे तारू ……पाया पडतो पण आरक्षण पदरी टाक….मी येतो….आदर्श राजे आणिक सोबत सिंचन राजे…..भेटी साठी वेळ द्यावा….. काम करतो आहोत आम्ही थाटामध्ये करु गवगवा…भेटीची मग वेळ ठरली….खलित्याची पेटी भरली….खलित्यासवे रिकामा कटोरा….. नुकतेच वादळ नुकतीच हानि……दाम करी काम आणि कटोराच आपल्या सरकारची आन बान शान…… आदर्श राजे म्हणतात धोड्यात जाऊ दे ओपन….. ते संगठीत नाहीत…..ओपनच्या चळवळीचा प्रश्नच् नाही…..ओपनचे कापून ह्यांनाच का देत नाही……ओपन वाले असेच झामे….. ९०% वाले सुद्धा कॉमर्स चे दिवाने….. मराठा आरक्षण देनं केंद्रा!!!!! ३५% वाला मराठा पण होईल अभियंता……ठेके घेतील बांधकाम पाडतील….. डॉक्टर सुद्धा लोकसंख्या पाडतील……लोकसंख्येला आळा घालण्या मदत करतील…… राज्याचा पैसा आमच्याच खिशात…. अन् केंद्रासाठी कटोरा…. दरवेळी थोडा मोठा कटोरा….कटो-यातले पण मग खिशात….. असेच चालते अपुले सरकार….जनता उगीच देते मार……खाऊन पिऊन सरकार गपगार…. मुद्द्याला आता घालू हात, विषयांतर ही झाले फार….. जाण्याआधी समयराजे भेट घेणे अगत्याचे…..समयराजे मग देती ज्ञान…… म्हणे मामु आपण पापे केली बहुअपार…..कसे ही करावे …. एकांतात भेटावे …… बंद दाराआड करावी चर्चा….. सपशेल लोटांगण अन् मग माफी सुद्धा मागावे…..संतची अपुला प्रधान मुनिश्वर……..वाझे परमबीर टेलिफोन टॅपिंग प्रकरणी तोची तारेश्वर….. मामु म्हणाला मनामध्ये…..होणार चर्चा बंद दाराआड एकांतामध्ये….देवसुद्धा किती दयाळू आहे…..मागल्या वेळी चर्चेनंतर माननीय मुख्यमंत्री झालो……करा सगळे जल्लोषाची तयारी…..आता अडीच वर्षांसाठी मी पंतप्रधान होणार आहे……
भाई देवघरे