वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

संजय उवाच .... !

काल धृतराष्ट्राच्या पायाशी बसलेलं
एक किरकीरं कार्ट बरळलं ,
ते जर स्वतःला फकीर म्हणवतात
तर पंधरा एकराचा भव्य महाल कां बांधतात !
तसा काही खोटा नाही बोलला हा रजा मुराद !
खरंच एकटा जीव सदाशिव माणसाला हवाय कशाला तो राजप्रासाद !
राजप्रसादात फकीर नाही राजे रहातात राजे !
अरे भाऊ ,पण तूच मागे बरळला होता ना कि आता दिल्लीच्या तख्तावर बसतील आमचे राजे !
मग? दिल्लीत काय ते भिकरड्या घरात राहतील कि काय ?
त्यांच्या इभ्रतीला साजेसा महाल तिथे नको काय ?
सात मजली मातोश्री 2 तिथे नेणे शक्य नाही !
म्हणून तुमच्या राजासाठी असा महाल बांधण्याशिवाय पर्याय नाही!
बघा ते प्रधानसेवक किती काळजी करतात तुमच्या राजांची !
आणि तरीही तुमची सवय काही जात नाही त्यांना शिव्याशाप देण्याची !
एखादा विष्टाखाऊ बरळला असता त्या ‘व्हीस्टा’विषयी , तर हरकत नव्हती !
पण एवढया दिव्यदृष्टीचे संजुबाबा तुम्हीसुद्धा असं बोलावं अशी अपेक्षा नव्हती !

       कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply