महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील मगर जखमी, आयसीयूत दाखल

नागपूर : ८ जून – महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील मगर मागील अनेक दिवसांपासून जखमी अवस्थेत होती. तिचा एक पाय देखील तुटला आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर उपचार सुरू असून सध्या तिला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे.
मगर जखमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर व महाराजबाग येथील कर्मचार्यांनी तिला महत्प्रयासाने पकडले आणि सेंटरमध्ये आणून तिची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. प्राथमिकदृष्ट्या डॉ. मयूर काटे, डॉ. सय्यद बिलाल अली यांनी तिची पाहणी केली. त्यात तिच्या जखमा अतिशय जुन्या आहेत आणि तिचा एक पाय देखील तुटला आहे.
त्यामुळे उपचार करुन तिला परत महाराजबागेत न पाठविता तिला ट्रांन्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या ती डॉ. काटे आणि डॉ. बिलाल यांच्या देखरेखीखाली असून यावेळी महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर, डॉ. रोहिणी टेंभुर्णे यांनी त्याठिकाणी भेट दिली. याप्रसंगी वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते देखील उपस्थित होते.

Leave a Reply