नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द होताच शिवसेनेने केला जल्लोष

अमरावती : ८ जून – खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याचा जल्लोष शिवसेनेच्यावतीने राजकमल चौकात करण्यात आला. यावेळी ढोल-ताशे व फटाक्यांची आतषबाजी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.
शिवसेनेचे अमरावती मतदार संघाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करून न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन निकाल आला आहे. ही बातमी अमरावतीत धडकताच शिवसैनिकांनी एकत्र येऊन राजकमल चौकात फटाके फोडले. ढोल-ताशे वाजवून निर्णयाचे स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रवीण हरमकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply