वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सल्लुमियां !

फुकाचे सल्ले देणाऱ्या सल्लुमियांचा
भारतात कधीच नव्हता तोटा !
त्यात कालपरवा अजून एक उपटसुंभ आले !
नाव त्यांचं ‘ पेटा ‘ !
ते म्हणतात, गाई,म्हशी आदि प्राण्यांचे दूध वापरू नका !
त्याऐवजी कृत्रिम दुधाचा वापर करा!
प्राण्यांच्या दुधाचा वापर म्हणजे
प्राण्यांना दुखवणे आहे !
आणि कृत्रिम दूध हे अधिक पौष्टिक आणि योग्य आहे !
या पेटल्यांचे वैशिष्ट्य हे कि ,
हे असा बावळट सल्ला, आपल्या युरोप किंवा अमेरिकेला देत नाही !
यांच्यासाठी असले सल्ले द्यायला
भारतासारखं गिऱ्हाइक नाही !
भारताने घडवून आणलेली श्वेतक्रांती
यांना बघवत नाही
यांना भारतातील शेतकऱ्यांचे आणि गोपालकांचे भले सहन होत नाही
आपल्या लाल आणि गोऱ्या पाश्चात्य
आकांच्या तुकड्यांवर पोसलेले हे आकु, सततच भू भू करत असतात !
एक चांगली पेकाटात बसली कि मगच , ते चूप बसतात !

         कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply