वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स मधून एम्फोटेरेसीन बी च्या ४५०० इंजेक्शन्सचा साठा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त

नागपूर : ७ जून – म्युकरमायकोसिस काळ्या बुरशीवर प्रभावी ठरणाऱ्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. परंतु याबाबत नागपूरमध्ये दिलासादायक बातमी समोर आली आहे. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफसायन्सकडून एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन निर्मितीला सुरवात झाली. यात साडेचार हजार इंजेक्शनचा साठा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सुपूर्त करण्यात आला आहे.
ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी या आजारावर एम्फोटेरेसीन बी या औषधाची निर्मिती वर्धा येथील जेनेटिक लेबोरेटरीज येथे सुरू करण्यात आली आहे. या औषधाचे वितरण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. या कंपनीचे प्रमुख डॉ. एम. डी. क्षीरसागर यांनी औषधाचा साडेचार हजारचा साठा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. हे औषध जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गरजू रुग्णांना देण्यात येणार आहे. औषधाच्या उत्पादनासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता. वर्धाच्या एम्फोटेरेसीन बी औषध निर्माण राज्यातील काळी बुरशी झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत सुके यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply